महाराष्ट्रात जाहीर झालेली शिक्षक (Teacher Constituency Election) व पदवीधर (Graduate Constituency Election) मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा आज करण्यात आली आहे. 10 जूनला ही 4 जागांसाठी आमदारकीची निवडणूक होणार होती मात्र आता ती पुढे गेली आहे. सध्या ही निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 2 मे ते 14 जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केला असून शाळा 15 जून नंतर सुरु होणार आहेत. त्यामुळे सुट्ट्यांच्या काळात निवडणूका आल्याने अनेक जण त्यांचा हक्क बजावण्यापासून दूर राहणार आहेत.
आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे या निवडणूका पुढे जाव्यात यासाठी आग्रही होते आता या निवडणूका अनिश्चित काळासाठी पुढे गेल्याने त्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. MLC Election 2024: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणूकीत ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधरसाठी अनिल परब, वरुण सरदेसाईंच्या नावाची चर्चा .
View this post on Instagram
विधानपरिषदे मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपत आहे. आता या चार जागांवर निवडणूक जाहीर झाली होती. पण आता नव्याने निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आता नव्या तारखा जाहीर होणार आहेत.