Kolhapur Shocker: कोल्हापुर येथे एका रिक्षाचालकांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला रिक्षाच्या मागून फरफटत नेल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मीना साठे वयवर्ष 60 अस त्या पीडीत महिलेचे नाव आहे. या अपघातात वृध्द महिलेची साडी रिक्षाला अडकली आणि रिक्षा चालकांच्या बेफिकरीमुळे हा अपघात घडून आला. काल दुपारच्या सुमारास सायबर परिसरातून ते माउली चौक परिसरात ही घटना घडली आहे. सदर महिलेला 100 मीटर फरफटत नेल्याने तीला गंभीर जखमा झाल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पीडीत महिला खरेदीसाठी बाजारात गेल्या असताना सायबर चौक ते माउली परिसरापर्यंत रिक्षा केली. याचदरम्यान रिक्षाच्या भाड्यावरुन दोघांत वाद झाले. स्थानिकांनी हे प्रकरण कळताच गर्दी केली. स्थानिकांनी रिक्षा चालकाला जाब विचारला असताना त्यांने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पीडित महिला रिक्षेला टेकून उभ्या राहिले दरम्यान त्यांच्या साडीचा पदर रिक्षेला अटकला आणि त्या रिक्षेसोबतच मागून फरफटल्या. हे विचलित दृश्य समोरच्या एका कॅमेराच कैद झाले. 100 मीटर पर्यंत रिक्षा चालकांने रिक्षा थांबली नाही. स्थानिक लोकांनी पाठलाग करताच त्यांच्या प्रयत्नांना यश आले. महिलेला त्या संकटातून बाहेर काढले. महिलेच्या मुलाने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
कोल्हापूर : रिक्षाच्या भाड्यावरुन वाद, गर्दी जमताच वाहन दामटवलं; महिलेला फरफटत नेलं pic.twitter.com/oLqWQ7lE4K
— Maharashtra Times (@mataonline) July 7, 2023
महिलेला गंभीर जखमा झाल्यामुळे तील रुग्णालयात नेण्यात आले आहे. हे कृत्य घडताच रिक्षा चालकाला स्थानिकांकडून चांगलाच चोप मिळाला आहे. अमिद मोमीन रिक्षा चालकावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिकांच्या चैनीचा प्रश्न उभा राहतो.