Jayant Pawar | Photo Credits: Facebook)

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन (Jayant Pawar Passes Away) झाले आहे. ते 61 वर्षांचे होते. पाठीमागील अनेक वर्षांपासून जयंत पवार (Jayant Pawar) हे कर्करोगाशी झुंजत होते. अलिकडील काळात त्यांचा कर्करोगाशी असलेला लढा यशस्वी होत होता. दरम्यान, त्यांचे निधन झाले. शनिवारी रात्री त्यांना अचानक अश्वस्थ वाटू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जयंत पवार यांच्या पश्चात पत्नी, पत्रकार-लेखिका असलेली कन्या संध्या नरे-पवार व मुलगी असा परिवार आहे.

गिरीणी कामगार, गिरणी कामगारांची चळवळ, मुंबई, मुंबईतील झोपडपट्टी आणि तळागाळातील सर्वसामान्य लोक यांच्याशी जयंत पवार यांची नाळ कायमची जोडली गेली होती. त्यांच्या लिखानातूनही त्याची छाप नेहमीच उमटत असेल. पत्रकार म्हणून ते सर्वपरीचित असले तरी नाटककार, समीक्षक आणि लेखक म्हणूनही ते महाराष्ट्राला परिचित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्पर्धेत पवार यांच्या 'काय डेंजर वारा सुटलाय' या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. ते 2014 मध्ये झालेल्या 15 व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षही राहिले होते. जयंत पवार यांनी लिहिलेल्या 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमी (2012) पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. (हेही वाचा,  Dr. Gail Omvedt Passes Away: डॉ. गेल ओमवेट यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

जयंत पवार यांनी लिहलेली नाटके

अंधातर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, दरवेशी

जयंत पवार यांनी लिहलेली पुस्तके

पाऊलखुणा, फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक, माझे घर, वंश, शेवटच्या बीभस्ताचे गाणे, होड्या

ट्विट

जयंत पवार यांनी विविध वृत्तपत्रे, मासिके आणि अलिकडील काळात डिजिटल माध्यमांसाठीही विपूल लिखान केले. त्यांचे लेख नेहमीच वाचनीय असत. प्रामुख्याने वर्तमान स्थितीत त्यांनी लिहिलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवरील त्याचे लेख विचकांच्या विशेष पसंतीस उतरत. शिवाय चित्रपट समिक्षा ही जयंत पवार यांच्या लेखनाचे विशेष अंग होते. त्यांनी मराठी, हिंदी आणि हॉलिवूड अशा विविध चित्रपटांचे केलेली समिक्षणं विशेष वाचनीय असत.