Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

जगभरात कोरोनचं थैमान सुरू असताना आता भारतामध्ये गरोदर महिलेकडून म्हणजेच आईकडून गर्भाला कोविड 19 चा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, पुण्याच्या ससून हॉस्पिटल (B J Medical College and Sassoon General Hospital) मधील ही रूग्ण आहे. BJMC च्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भारतामधील पहिली केस आहे ज्यामध्ये SARS-COV-2 या कोविड 19च्या व्हायरसचं ट्रान्समिशन हे गरोदर महिलेमधून तिच्या गर्भामध्ये पोहचलं. अजूनही गरोदर स्त्रियांमध्ये गर्भापर्यंत हा व्हायरस कसा पोहचू शकतो हे कोडं उलगडलेले नाही.

कोरोना व्हायरसची दहशत जेव्हा पासून सुरू झाली तेव्हापासूनच भारतामध्ये आयसीएमआर ने गरोगर स्त्रियांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार एप्रिल 2020 मध्ये विशेष नियमावलीदेखील जारी करण्यात आली होती. त्यामध्ये जगभरात कोरोना व्हायरस गर्भाला संसर्ग पोहचवू शकतो असा अंदाज आणि त्याबद्दल काही रूग्ण समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

पुणे शहरामध्ये भारतातील vertical transmission in Covid-19 ची पहिली घटना

मे 2020 च्या शेवटच्या आठवड्यात हडपसर येथील 22 वर्षीय गरोदर महिलेला प्रसुतीच्या एक दिवस आधी ताप आल्याने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा या महिलेची कोविड 19 साठी RT-PCR test करण्यात आली तेव्हा ती निगेटीव्ह होती. मात्र अ‍ॅन्टिबॉडी टेस्ट तिला कोरोना व्हायरसचं इंफेक्शन होऊन गेल्याचे संकेत देत होते. बाळचा जन्म झाल्यानंतर स्वॅब, नाळ (placenta) आणि नाभी जवळचा भाग(umbilical stump) यामधील नमूने RT-PCR test मध्ये पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर 24-48 तासांतच कोविड 19 ची लक्षणं दिसायला लागली, ज्यामध्ये ताप देखील होता. यानंतर अतिदक्षता विभागामध्ये बाळावर उपचार झाले आणि 3 आठवड्यांनी कोरोनामुक्त होण्यात यश आलं. दरम्यान गरोदर महिलेला पूर्वीच इंफेक्शन होते परंतू असिम्प्टमेटिक असल्याने ते लक्षात आलं नसल्याचं डॉ. किनिकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान पुण्याच्या सर्वात मोठ्या शासकीय रूग्णालयामध्ये 14 ते 23 जुलै दरम्यानच्या लॉकडाऊनमध्ये एकूण 42 कोविड 19 पॉझिटिव्ह जणींची प्रसुती झाली आहे. यामध्ये पोस्ट नॅटल ट्रान्समिशनद्वारा 6 नवजात बाळांना कोरोनाची लागण झाली आहे. अन्य कोरोना निगेटिव्ह आहेत. Kawasaki Disease सदृश्य लक्षणं मुंबई मध्ये लहान COVID-19 रूग्णांमध्ये दिसायला सुरूवात; कावासाकी आजार नेमका आहे काय?

इंटरनॅशनल जर्नल मध्ये प्रसिद्ध होणार अहवाल

दरम्यान भारतामधील या दुर्मिळ केसबाबत अमेरिकेच्या एका उच्च दर्जाच्या जर्नलमध्ये अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे. दरम्यान काही तासांपूर्वीच त्याबाबतची अनुमती मिळाली असल्याची माहिती ससून हॉस्पिटलच्या डॉ. आरती किनिकर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली आहे. दरम्यान बाळावर उपचार करण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता.

दरम्यान जगभरात एचआयव्ही, झिका व्हायरसच्या Vertical infection ची म्हणजेच आईकडून गर्भाला होणार्‍या इंफेक्शनची माहिती डॉक्युमेंट्सच्या स्वरूपात उपलब्ध आहे. मात्र अद्याप कोविड 19 बद्दल तशी शास्त्रीय माहिती नाही. पुण्यातील पहिलीच केस Vertical infection बाबत भारतामध्ये समोर आली आहे.