Veena Kapoor (PC - Instagram / nilukohli)

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकारानंतर हादरवणार्‍या अनेक घटना समोर आल्या. अशामध्येच अभिनेत्री वीणा कपूर यांच्यादेखील हत्येची बातमी समोर आली होती. पण अभिनेत्री वीणा कपूर यांचा खून झाल्याची घटना खोटी असल्याचं समोर आलं आहे. खूनामुळे चर्चेत असलेल्या वीणा कपूर (Veena Kapoor) स्वतः दिंडोशी (Dindoshi) पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाल्या असून त्यांनी एनसी (NC) नोंदवली आहे.

जुहूमध्ये वीणा कपूर या महिलेचा खून झाला आहे पण खरा गोंधळ उडाला आहे त्यामागे नावाचं साधर्म्य असल्याचं सांगण्यात आले आहे. यामुळे अभिनेत्री वीणा कपूर यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. टेलिव्हिजन वर काम करणार्‍या वीणा कपूर यांचा खून अथवा मृत्यू झालेलाच नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सोशल मीडीयात कोणत्याही बाबींची खातरजमा न करता अभिनेत्री वीणा कपूर यांचा खून झाला असल्याचा आणि तो त्यांच्याच मुलाने प्रॉपर्टीसाठी केला अशी वृत्त वायरल झाली होती. पण या खोट्या वृत्तांमुळे वीणा कपूर आणि त्यांच्या मुलाला मनस्ताप होत असल्याने काल (14 डिसेंबर) त्यांनी दिंडोशी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. नक्की वाचा: Veena Kapoor Death: प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूरची मालमत्तेसाठी निर्घृण हत्या; मुलाने आईचा मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये लपवून जंगलात फेकला .

वीणा कपूर यांनी आपल्याला सोशल मीडीयात श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुलाला अपमानास्पद बोललं जात आहे याचा त्रास होत असल्याचं तसंच मृत्यूच्या बातमीमुळे काम देखील मिळत नसल्याचं म्हटलं आहे.

वीणा यांचा मुलगा Abhishek Chadda याने मिड डे सोबत बोलताना,'आईबाबत खोट्या बातम्या वाचून त्रास झाला असल्याचं म्हटलं आहे. माझं आईवर प्रेम आहे. त्यामुळे तिच्या खूनाबद्दलच्या बातम्या खूपच क्लेशदायक असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी फोन करून देखील चौकशी केल्याचं म्हटल्याचं त्याने सांगितलं आहे.