Veena Kapoor Death: टीव्ही इंडस्ट्रीतील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर (Veena Kapoor) ची तिच्याच मुलाने निर्घृण हत्या (Murder) केली आहे. 74 वर्षीय वीणा कपूरला तिच्या 43 वर्षीय आरोपी मुलाने बॅटने मारहाण केली. यानंतर अभिनेत्रीचा मृत्यू झाला. वीणा कपूर मर्डरची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती तिची सहअभिनेत्री नीतू कोहली (Neetu Kohli) ने दिली आहे.
नीतू कोहली झाली भावूक -
मेरी भाभी सीरियल फेम वीणा कपूरच्या निधनाची माहिती तिची सह-अभिनेत्री नीतू कोहलीने इंस्टाग्रामवर दिली आहे. नीतू कोहलीने इंस्टाग्रामवर वीणा कपूरसाठी एक लांबलचक पोस्ट लिहिली, 'वीणा जी तुम्ही यापेक्षा चांगल्यासाठी पात्र होतात. माझे हृदय तुटले आहे, तुमच्यासाठी ही पोस्ट करत आहे, मी काय बोलू? आज मी शब्दशून्य आहे, मला आशा आहे की इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर तुम्ही शेवटी शांततेत आराम करत आहात.' (हेही वाचा - Sulochana Chavan Passes Away: लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण कालवश; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
दरम्यान, जुहू येथील बंगल्यात ही दुःखद घटना घडली आहे. येथे अभिनेत्रीच्या मुलाने आपल्या आपल्या 74 वर्षीय आईला बेसबॉलच्या बॅटने मारहाण केली आणि नंतर मृतदेह माथेरानमध्ये फेकून दिला. नीतू कोहली यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, चौकशीदरम्यान आरोपी मुलाने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने अनेकवेळा त्याच्या आईवर बॅटने हल्ला केला आणि नंतर रागाच्या भरात तिची हत्या केली.
View this post on Instagram
रिपोर्ट्सनुसार, वीणा कपूरच्या मुलाने मुंबईतील जुहू येथे असलेल्या 12 कोटींच्या फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी आईची हत्या केली. नीतू कोहलीच्या या पोस्टवर अनेक कमेंट होत आहेत, सेलिब्रिटी वीणा यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहत आहेत.