Fire (PC - File Image)

Vasai Bus Fire: वसई विरार महापालिकेच्या बसला अचानाक आग लागल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. वसई पश्चिमेच्या मुख्य रस्त्यावर पालिकेच्या बसला शुक्रवारी आग लागली. रात्री 8.45 च्या सुमारास चालू बसमधून अचानक धूर निघाला होता. बसमधून धूर येत असल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. तात्काळ बस चालकाने आणि कंडक्टरे बसमधील सर्व प्रवाशांना बस मधून बाहेर काढले आणि मोठा अर्नथ होण्यास टळला.(  हेही वाचा- बोरिवलीतील इमारतीच्या पार्किंगला आग, 25 ते 26 गाड्या जळून खाक)

मिळालेल्या माहितीनुसार, या बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. आगीची माहिती मिळताच, वसई येथील अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पाचारण करण्यात आले. नागरिकांनी आणि अग्निशानक दलाच्या जवानांनी पाणी टाकून आग विझवण्याचे काम केले.  अथक प्रयत्नांनतर आग आटोक्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

या घटनेनंतर बराच काळ परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.या घटनेनंतर नागरिकांनी पालिकेकडे सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. पालिकेच्या बस दुरुस्ती न करता रस्त्यावर चालत असल्यामुळे अश्या अनेक घटना घडत असतात. बसचे मेंटेनस, दुरुस्ती वेळेवर करावे अन्यथा अश्या घटनांना सामोरे जावा. अशी तक्रा वसई विरार नागरिकांकडून येत आहे.