Fraud (Photo Credits: IANS) | Representational Image

मुंबई स्थित वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या  (Varun Industries Ltd) संचालकांविरुद्ध दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल CBI कडून दोन स्वतंत्र एफआयआर (FIR) नोंदवले आहेत. कंपनीचे दोन संचालक किरण मेहता आणि कैलाश अग्रवाल यांच्यासह अन्य दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणात 269 कोटी रुपयांची फसवणूक आणि दुसऱ्या प्रकरणात 118 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. एकूण 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.  (हेही वाचा - Baramati Robbery: अंधश्रद्धाळू चोरट्यांनी 'शुभ मुहूर्त' पाहून टाकला दरोडा; तब्बल 1 कोटींचा ऐवज लंपास, ज्योतिषासह सहा जणांना अटक)

मुंबईच्या वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या फर्मवर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लाईव्ह मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, वरुण इंडस्ट्रीजवर या बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एप्रिल 2023 मध्ये वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दोन कंपन्या एक वरुण ज्वेल आणि दुसरी ट्रायमॅक्स डेटा सेंटरची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात आली होती. वरुण ज्वेलनं पीएनबीकडून कर्ज घेऊन त्यांच्या खात्यात 46 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. यानंतर वरुण ज्वेलचं खातं एनपीए झालं आहे.

कंपनीचं खातं एनपीए झाल्यानंतर पीएनबीला 63 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कंपनीनं पीएनबीकडून कर्ज घेऊन 8 कोटी रुपये मॉरिशसमधील सहाय्यक कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. वरुण इंडस्ट्रीजची दुसरी कंपनी ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेसशी संलग्न असलेल्या ट्रायमॅक्स डेटासेंटर सर्व्हिसेसनं 2014 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रकडून 29 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं आणि अनेकांना पैसे हस्तांतरित केले होते.