उर्मिला मातोंडकर (Photo Credit : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर आता ती शिवसेनेची (Shiv Sena) कास धरणार का? अशा चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. मात्र आता उर्मिला मातोंडकर कडून आलेल्या स्टेटमेंटनुसार कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता ती दुसर्‍या कोणत्याच पक्षामध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.  उर्मिलाने येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Election) मध्ये ती कोणत्याच पक्षामध्ये सहभागी होणार नाही. असं स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत उर्मिलाचे झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता उर्मिला मातोंडकरदेखील शिवसेना पक्षात प्रवेश करणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला होता. त्याबाबत उलट सुलट चर्चांमधून उर्मिलाच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या बातम्यादेखील समोर आल्या होत्या. नक्की वाचाउर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षातून बाहेर, पक्षांतर्गत कलहाला कंटाळून राजीनामा.

लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्या विरूद्ध निवडणूकदेखील लढली. मात्र ती निवडून येऊ शकली नाही. त्यानंतर 10 सप्टेंबर 2019 दिवशी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत कलहामुळे आपण कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं तिने स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसांतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा झाल्याने मीडियात सुरू असलेल्या चर्चांना आता उर्मिला मातोंडकरने पुर्णविराम लावला आहे. शिवसेना सोबतच इतर कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करत नसल्याचं म्हटलं आहे. Maharashtra Assembly Elections 2019 Dates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारखा 19, 20 सप्टेंबर दिवशी जाहीर होण्याची शक्यता; केंद्रीय निवडणूक आयोगाचे त्रिसदस्यीय मंडळ राज्यात घेणार आढावा

समाजसेवेचा उदात्त हेतू ठेऊन आपण राजकारणात आलो. खास करुन काँग्रेस पक्षात आलो. मात्र, पक्षांतर्गत असलेल्या वादामुळे आपल्या हेतूला बाधा येत असल्यानेच आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचं उर्मिला मातोंडकरने म्हटलं आहे.