Urfi Javed Molested By Drunk Boys: उर्फी जावेद (Urfi Javed) ही सोशल मीडियावरिल कलाकार नेहमीच वेगवेगळ्या फॅशनमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारांपैकी ती एक आहे. तिच्या फॅशनच्या (Fashion) चर्चा तर नेहमी होत असतात. काही मद्यधुंद तरुणांनी विमानात प्रवास करताना तिची छेड काढत असल्याच ती इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे. मुंबई ते गोवा विमानातून प्रवास करताना तीच्याबरोबर असा धक्कादायक प्रकार घडला आहे. सद्या सोशल मीडियावर या संदर्भात जोरदार चर्चा चालू आहे. मध्यधुंद तरुणांनी तीचा शोषण केल्याचं सांगितले आहे.
व्हिडीओमध्ये ही मुले घाणेरडे बोलत होते आणि विनयभंग करत होते. ते माझे नाव घेत होते. मी त्यांना अडवले तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की, त्याचे मित्र नशेत आहेत. मद्यधुंद असल्यामुळे ते असे आहेत. पण दारू पिऊन स्त्रीशी गैरवर्तन करण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही. मी एक सार्वजनिक व्यक्ती आहे, सार्वजनिक मालमत्ता नाही' असे उर्फीने म्हटले आहे. उर्फीने या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. अगदी भयंकर वृत्तीने या गोष्टी घडत आहे.
शुक्रवारी गोव्याला पोहल्यावर तीनं बार्बी लूकचा फोटो शेअर केला. लवकरच ती एकता कपूरच्या चित्रपटात झळकणार आहे. प्रेक्षकही तीला चित्रपटात काम करण्यासाठी प्रोत्साहन करत आहे. सोशल मीडियावर नेहमीच उर्फी वेगवेगळ्या अवतारात झळकते. फॅशनमुळे लोकांचे मनोरंजन करते.