अवकाळी पाऊस आणि तापमान | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Weather Update: राज्यातील तापमान उन्हामुळे चांगलेच वाढले आहे. सुर्योदय झाल्यानंतर पुढच्या काहीच तासात अगदी सकाळीही कोवळ्या उन्हाचा चटका वाढतो आहे. दुपारी तर सुर्य आग ओकताना दिसतो आहे. अशा स्थितीत उकाड्याने जीवाची घालमेल होणारे जीव आणि पाणी नसल्याने सुखलेली झाडे पाऊस कधी पडतो याचीच प्रतिक्षा करत असतात. अशा वेळी अवकाळी पाऊस राज्यातील अनेक ठिकाणी बरसतो आहे. भारतीय हवामान विभागानेही हवामान अंदाज (IMD Weather Forecast) वर्तवताना पाऊस, गारपीट (Garpit) आणि वादळी वारे याबाबत भाष्य केले आहे.

विदर्भात गारपीटीची शक्यता

आयएमडी हवामान अंदाज  सांगतो की, विदर्भातील विविध ठिकाणी हलका, मध्यम ते काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारपीट यांसह पाऊस पडेल असे म्हटले आहे. या पावसावेळी वारे साधारण प्रति तास 40-50 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यताही वर्तवली आहे. (हेही वाचा, IMD Weather Update: आज पाऊस पडेल का? आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून; महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये गारीपटीची शक्यता)

मध्य महाराष्ट्र, विदर्भात विजांच्या कडकडाट पण तुरळक पाऊस

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या प्रदेशात विजांचा कडकडाच आणि मेघगर्जना होईल मात्र या ठिकाणी तुरळक पावसाचीच शक्यता असल्याचे आयएमडी म्हणते. शिवाय या भागात वादळी वारे प्रति तास 50-60 किमी वेगाने वाहू शकेल असा अंदाज आहे.

एक्स पोस्ट

काही शहरांना 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट

दरम्यान, आयएमडीने 12 ते 18 मे हा चार दिवसांचा काळ काही शहरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या ठिकाणी 'यलो' आणि 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. खास करुन पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा, कोल्हापूर मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर तर मराठवाड्यामध्ये नांदेड आणि लातूर, विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

एक्स पोस्ट

कोकणामध्ये वादळी वारे आणि विजांचा कडकडाट

कोकणामधील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. मात्र, या भागात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळू शकतो. शिवाय प्रति तास 30-40 किमी वेगाने वारे वाहू शकते, असा अंदाज आयएमडाने वर्तवला आहे.

एक्स पोस्ट

मंबईमध्ये वातावरण कोरडे आणि आकाश निरभ्र

राजधानी मुबईबाबत हवामानाचा अंदाज वर्तवताना मात्र शहर आमि उपनगरांमध्ये आकाश कोरडे आणि निरभ्र राहील असे म्हटले आहे. मात्र, सायंकाळी हे आकाश काहीसे ढगाळ होऊ शकते. शहरातील कमाल आणि किमान तापमान साधारण 35 ते 27 सेल्सिअस अंशाच्या आसपास असण्याची शक्यता आहे.