Unlock in Solapur: सोलापूर शहरात लॉकडाउनच्या नियमात आणखी शिथीलता, पहा काय सुरु-बंद राहणार
प्रतिकात्मक फोटो (Phoro Credits-Twitter)

Unlock in Solapur:  महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे नियम आता शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने त्या संदर्भातील नियमावली नागरिकांसाठी जाहीर केली आहे. अशातच आता सोलापूर शहरात लॉकडाउनच्या नियमात आणखी शिथीलता आणली गेली आहे. त्यानुसार सोलापूरात कोणत्या गोष्टी सुरु असणार आणि नाही याबद्दल महापालिने जाहीर केले आहे. तर सोलापूरात हे नियम 14 जून पासून सकाळी 7 वाजल्यापासून लागू होणार आहेत.(मुंब्रा: कोरोनामुळे नोकरी गमावणाऱ्या IT इंजिनियर आणि डबल ग्रॅज्युएट तरुण करतायात नाल्यांची सफाई)

सोलापूरात लेव्हल 1 नुसार महापालिका हद्दीमधील निर्बंध हटवले आहेत. तसेच शहरातील सिनेमागृहे, नाट्यगृहे, मॉल्स, रेस्टॉरंट हे नियमीतपणे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचसोबत विवाह सोहळ्याला 50 ऐवजी आता 100 माणसे उपस्थितीत राहू शकतात. तर अत्यंतसंस्कारासाठी सुद्धा सूट दिली आहे. पण नागरिकांना नियमांचे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा नियम मोडल्यास दंड वसूल केला जाईल अशा सूचना सुद्धा दिल्या आहेत. तर पहा सोलापूरात काय सुरु आणि काय बंद राहणार त्याबद्दल अधिक.(Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 10,442 रुग्णांची व 483 मृत्यूंची नोंद)

-दुकाने, हॉटेल्स-रेस्टॉरंट, सार्वजनिक ठिकाणे आणि मॉर्निंक वॉकला जाण्यासाठी नागरिकांना परवानगी असणार आहे.

-जिम, मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेसह सुरु करता येणार

-खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये पूर्णपणे उपस्थिती कर्मचाऱ्यांना लावता येणार आहे.

-अत्यंसंस्कारसाठी कोणतेही नियम लागू नसणार आहेत.

-सलून, ब्युटी पार्लर, बस सेवा ही सुद्धा नियमितपणे सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान, सोलापूर ग्रामीण भागात सध्या सुरु असलेल्या निर्बंधांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.सोलापूर ग्रामीण भाग हा तिसऱ्या टप्प्यात अनलॉक होणार आहे. त्यामुळे 7 जून रोजी जे निर्बंध होते तेच पुढे सुद्धा पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहेत.