मुंब्रा: कोरोनामुळे नोकरी गमावणाऱ्या IT इंजिनियर आणि डबल ग्रॅज्युएट तरुण करतायात नाल्यांची सफाई
Drain Cleaning (Photo Credits-Facebook)

Mumbra: कोरोना व्हायरसचा सर्वांनाच फटका बसला आहे. खाकरुन नोकरदार वर्गातील बहुतांश जणांची कोरोनाच्या काळात नोकरी गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. ऐवढेच नाही तर त्यांना एकवेळ जेवण सुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे. आरोग्याला सुद्धा कोरोनामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार कोरोनाच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच आता बहुतांश आयटी इंजिनियर ते डबल ग्रॅज्युएट झालेली लोक मिळेल ते काम करण्यास तयार आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांच्याकडून नाल्यांची सफाई केली जात आहे.

महाराष्ट्रातील मुंब्रा येथील कोरोनाच्या काळात नोकरी गेल्याने काहीजणांना नाईलाजाने नाल्यांची सफाई करावी लागत आहे. आयटी इंजिनअर आणि डबल ग्रॅज्युएट झालेली लोक पैसे मिळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात नाल्यांची सफाई करत आहेत. PTI सोबत बातचीत करताना एका तरुणाने सांगितले की, नाले सफाई करुन जे काही पैसे मिळतात त्यावर घर चालविले जाते. तसेच काम कोणतेही असो ते काम कामच असते.(नागपूर मध्ये 35 वर्षीय महिलेने 25 दिवस Ventilator आणि 45 दिवस हॉस्पिटल मध्ये कोविड 19 शी सामना करून मिळवला आजारावर विजय; वाचा तिचा प्रेरणादायी संघर्ष)

अशातच आणखी एका तरुणाने म्हटले की, त्याचे शिक्षण डबल ग्रॅज्युएशन पर्यंत झाले आहे. तो गेल्या तीन महिन्यांपासून ठेकेदारासोबत काम करत आहे. त्याने पुढे असे म्हटले की, काही कंपन्यांमध्ये कामासाठी अप्लाय सुद्धा केले. मात्र कोरोनामुळे अद्याप कंपन्या बंद असण्यासह त्या नोकऱ्या सुद्धा देत नाही आहेत. पण सध्याच्या काळात नोकरीची अत्यंत गरज आहे. त्यामुळे परिवाराला सुखाचे दोन घास तरी खाता येतील.(Nagpur: अशक्य ते शक्य करतील गावकरी! बोअरवेलमध्ये पडलेल्या बाळाला जीवदान, नागपूर जिल्ह्यातील शिवनी भोंडकी येथील घटना)

नाल्यांची सफाई करणाऱ्या आयटी इंजिनिअर तरुणाने म्हटले की, कोणतेही काम करण्यास लाज बाळगू नये. आपल्याला जिवंत रहाण्यासह परिवाराची मदत करायची असल्यास काही ना काही काम करावे लागेल. तेव्हा शिक्षण मध्ये येत नाही . तर मुंब्रा परिसरातील एका ग्रुपकडून नाल्याची खोदणी केली जात असून त्यात या सर्वांचा समावेश आहे.