
एखादा व्यक्ती एखाद्या परिस्थितीत नेमका कसा वागेल याचा अंदाज कोणालाच लावता येत नाही. असंच काहीसं पुण्यात घडलं आहे. मदत केल्यानंतर आभार मानणाऱ्या व्यक्तीला तरुणाने किस केल्याची घटना पुण्यातील कॅम्प परिसरातून समोर आली आहे. या प्रकरणी लष्कर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालेवाडीत येथील इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेली 21 वर्षीय तरुणी रस्ता चुकली. त्यात तिचा मोबाईलही बंद पडला. ही माहिती आपल्या मित्राला देण्यासाठी ती रस्त्यानं जाणाऱ्या एका तरुणाकडे मदत मागितली. त्याच्याकडून मोबाईल घेत तिने आपल्या मित्राला फोन केला आणि रस्ता चुकला असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने मोबाईल परत करुन मदत करणाऱ्या तरुणाचे आभार मानले. शेकहँड करण्यासाठी तिने हात पुढे करताच तरुण तिचा हात पडकला आणि चक्क तिला किस केले. (मुंबई: पाठलाग करुन तरुणीचे जबरदस्तीने चुंबन; आरोपीला अटक)
पुण्यातील कॅम्प परिसरातील अरोरा टॉवर जवळ काल दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर तरुणी गोंधळून गेली आणि आरोपी तेथून पसार झाला. त्यानंतर तरुणीने मित्राच्या साहाय्याने गुन्हा दाखल केला असून पोलिस मोबाईल नंबरच्या आधारे तरुणाचा शोध घेत आहेत.