Ramdas Athawale: यह जुमला नहीं, हमला है; अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लिहली 'अशी' भन्नाट कविता
Ramdas Athawale (Photo Credit: ANI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर केला आहे. त्यानंतर संपूर्ण देशभरात या बजेट संदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केंद्र सरकारच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. तर, याच अर्थसंकल्पावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच 'यह जुमला नहीं हमला है', अशी कविता करत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.

केंद्र सरकारचे अर्थसंकल्प घोटाळ्याचे नसून विरोधकांची शाळा घेणारे आहे. विनाकारण टीका करणाऱ्या लोकांवर हल्ला करणारे हे अर्थसंकल्प आहे. हे अर्थसंकल्प सर्व वर्गांना न्याय देणारे आहे. तसेच काँग्रेस व विरोधकांचा बदला घेणारे आहे.” अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी एएनआय वृत्त संस्थेला दिली आहे. हे देखील वाचा- Uddhav Thackeray on Union Budget 2021: बजेट हा देशासाठी पाहिजे, निवडणुकांसाठी नको; केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

एएनआयचे ट्विट-

निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर संपूर्ण देशभरात या बजेट संदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केंद्राच्या अर्थसंकल्पामुळे आता महाराष्ट्रातही चांगलेच राजकारण तापले आहे. या अर्थसंकल्पानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत.