Narayan Rane | (Photo Credits-ANI Twitter)

केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane Arrest) यांना रत्नागिरी पोलिसांनी (Ratnagiri Police) अटक केली  आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने (Ratnagiri Sessions Court) फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालात धाव घेतली. परंतू, मुंबई उच्च न्यायालयानेही राणे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूण ला रवाना झाले होते. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले. कायदेशीर कारवाई पूर्ण केल्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार, असल्याची माहिती आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी माहिती देताना सांगितले की, रत्नागिरी पोलिस अधिक्षकांना विनंती केली आहे की, नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घ्यावे. त्यानंतर त्यांना रमांड घेऊन, कोर्टासमोर हजर करुन आणि कायेशीर प्रक्रिया पूर्ण करुन नाशिक पोलिसांच्या ताब्यात द्यावे. (हेही वाचा, Narayan Rane: नारायण राणे यांची अटक प्रक्रिया कायद्यानुसार, नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची माहिती)

ट्विट

ट्विट

नारायण राणे यांना अटक करण्यात आली तेव्हा रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक स्वत: उपस्थित होते. रत्नागिरीच्या पोलीस अधिक्षकांनी स्वत: जाऊन नारायण राणे यांना अटकेबाबत माहिती दिली. त्यांच्यावर असलेले आरोप, दाखल झालेला गुन्हा, लावण्यात आलेली कलमं या बाबतीतली माहिती दिली. तसेच, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे कोणत्याही प्रकारे प्रोटोकॉलचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले.