लॉकडाऊन काळात नाशिक विभागामध्ये 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने'अंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) (मनरेगा) 75 हजार 997 मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मनरेगा अंतर्गत शेल्फवर 98 हजार 851 कामे ठेवण्यात आली आहेत. यात 1 लाखापेक्षा अधिक अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देण्याची येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात यासंदर्भात राज्यातील जिल्ह्याधिकाऱ्यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत कामाची उपलब्धता करून देण्यात येत आहे. नाशित विभागातील एकूण 5077 पैकी 2603 ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा अतंर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत. (हेही वाचा - राज्यात आज दिवसभरात 30 हजार 624 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा)
दरम्यान, मनरेगा कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून अगदी सुरक्षितरित्या कामे करण्यात येत आहेत. सध्या अहमदनगर जिल्ह्यात 10310, धुळे 11080, जळगाव 5441, नाशिक 20344 आणि नंदुरबार जिल्ह्यात 28800 मजूर कामावर आहेत. नाशिक विभागीय आयुक्त राजारामा माने उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात जलसंधारण व गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. (वाचा - Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये 1751 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 27,068 वर)
मनरेगा अंतर्गत मजूरांना एका दिवसासाठी 238 रुपये मजूरी देण्यात येत आहे. या मजूरांना आठ दिवसाच्या आत मजूरीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराची चांगली संधी मिळाली आहे.