Photo Credit- X

Mumbai Accident: मुंबईतील काळाचौकी येथे रविवारी भीषण अपघात झाला. पोलिसांनी या अपघात प्रकरणी एकास अटक केले आहे. या अपघातात नऊ जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात गोंधळ परिस्थिती निर्माण झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की, यात बससह दुचाकीचे नुकसान झाले. ही घटना रात्रीच्या वेळीस ८.४५ च्या सुमारास घडली. (हेही वाचा- गाझियाबादमध्ये कचरा भरणाऱ्या ट्रकच्या धडकेत 2 वर्षीय मुलगी गंभीर जखमी; पहा व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाने एका मद्यधुंद असलेल्या व्यक्तीशी वाद झाला. वाद सुरु असताना बस चालकाकडून बस अनिंयत्रित झाली. बस अनियंत्रित झाल्याने समोर असलेल्या दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडकली. या धडकेत दहा पादचारी जखमी झाले. तर महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ खळबळीचे वातावरण होते.

गंभीर जखमी झालेल्या महिलेला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. नुपूर मणियार असं महिलेचे नाव आहे. ती लालबाग येथील रहिवासी होती. दत्ता मुरलीधर शिंदे असं मद्यधुंद असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ज्याच्यामुळे हा भीषण अपघात घडला.  अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. काळाचौकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले की, दहा जण जकमी झाले. त्यांना फ्रॅक्चरसह गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी  केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.