Sexual Crime | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Sexual Attack On Infant: नोव्हेंबर 2021 मध्ये एका 23 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Attack) केल्याप्रकरणी एका विशेष POCSO न्यायालयाने 21 वर्षीय व्यक्तीला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा (Imprisonment) सुनावली आहे. आईने आपल्या तक्रारीत दावा केला आहे की ती तिचा पती, त्याचे आई-वडील, दोन भाऊ आणि एका बहिणीसोबत राहत होती. आरोपी हा तिच्या पतीचा भाऊ आहे. तिने सांगितले की, आरोपी मुलाला झोपण्यासाठी तळघरात घेऊन जात असे.

एक दिवशी तिला मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सूज आल्याचे दिसले. तिने याबाबत तिच्या पतीकडे तक्रार केली पण त्याने प्रतिसाद दिला नाही. 18 नोव्हेंबर रोजी पुन्हा आरोपीने मुलीला झोपण्यासाठी तळघरात नेले. पण मुलगी रडू लागली. नंतर, जेव्हा आई तिला टॉयलेटमध्ये घेऊन गेली तेव्हा तिला मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर ओरखडे दिसले. तक्रारदार महिलेने ही जखम आपल्या सासूला दाखवली. मात्र, त्यांनी हे संसर्ग किंवा डास चावले असावेत, असा अंदाज लावला. (हेही वाचा - HC On Fake Sports Certificates: बोगस प्रमाणपत्रे वापरून क्रीडा कोट्यातून नोकरी मिळवणाऱ्या राज्य सरकारी 2 कर्मचाऱ्यांची बडतर्फ कायम; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय)

दरम्यान, यानंतर महिलेने त्यांच्या फॅमिली फिजिशियनचा सल्ला घेतला. त्यावेळी डॉक्टरांनी हे हे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण असल्याचं मत व्यक्त केलं. तथापि, पतीच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, आई त्यांना 8 लाख रुपये न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. आईने स्वच्छता पाळली नसल्याने मुलीला संसर्ग झाल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय, बचाव पक्षाने असा दावा केला की, आईने खोटा गुन्हा दाखल केला असून आरोपीने काही दिवसांपूर्वी तिच्याशी गैरवर्तन केले होते. त्यामुळे ती आता त्याचा बदला घेत आहे.

डास चावल्यामुळे सूज आणि लालसरपणा शक्य आहे. परंतु डास चावल्यामुळे किंवा अस्वच्छ स्थितीमुळे जखम होणे शक्य नाही अशी साक्ष डॉक्टरांनी दिली. न्यायालयाने डॉक्टरांचे मत विचारात घेतले. तसेच कोणाचाही बदला घेण्यासाठी कोणत्याही आईने आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारची दुखापत करू शकत नाही, असंही यावेळी न्यायालयाने नमूद केलं.