Umesh Kolhe Murder Case: अमरावती मधील उमेश कोल्हे हत्याकांडाचा तपास  NIA कडे 21 जून दिवशी सोपावल्याची  केंद्रीय गृह खात्याकडून ट्वीट करत माहिती
NIA | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात अमरावती मध्ये फार्मासिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्याकांडातील तपासात आता वेगवान घडामोडी समोर येत आहेत. राजस्थानच्या उदयपूर मध्ये झालेल्या कन्हैयालाल हत्येप्रमाणे उमेश कोल्हेची हत्या झाल्याचा संशय आहे. गृह मंत्रालयाने आज ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी तपास 21 जून दिवशी एनआयए (NIA) कडे दिला आहे. गृह खात्याच्या माहितीनुसार या हत्येमागे कट, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल.राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि एटीएसची टीम अमरावतीत पोहोचली आहे. विक्रम साळी, डीसीपी अमरावती यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 6 जणांना अटक झाली असून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर आयपीसी कलम ३०२ (हत्या), १२० ब (गुन्हेगारी कट), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याने फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस आणि काँग्रेस नेत्यांवर मुद्दाम चोरीचे प्रकरण असल्याचा आरोप केला आहे. Supreme Court On Nupur Sharma: नुपूर शर्माला सुप्रीम कोर्टाने फटकारले; म्हणाले, 'तुमच्यामुळे देशाची सुरक्षा बिघडली, असभ्य भाषेसाठी माफी मागा' .

उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कडून पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर तपासाच्या आधारे शाहरुख पठाण, मुदस्सीर अहमद, आतिफ रशीद, शमीम फिरोज अहमद यांना अटक करण्यात आली आहे. उमेश मेडिकल स्टोअर बंद करून घरी जात असताना हा खून झाला आहे. काही लोकांनी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला आणि नंतर त्याला अडवून गळ्यावर वार करण्यास सुरुवात केली. उमेश कोल्हे यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.