
Ulhasnagar Crime: उल्हासनगर येथे एका सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे निष्पण झाले आहे.उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. स्वप्नील कानडे असे खून झालेल्यां तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात देखील एका सराईत गुन्हेगारीची हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील कानडेची धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्याने निघृण हत्या केली. मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षक घटनास्थळी दाखल झाले. ही घटना रविवारी पहाटे ४ते ५ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील एसएसटी कॉलेजसमोर असलेल्या सद्गुरू वॉशिंग सेंटरच्या पाठीमागे झाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. स्वप्निलचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल कानडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, चोरी, मारामारी अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला होता. सापळा रचून पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीनंतर आरोपींनी हत्या पूर्ववैमनस्यातून केल्याचे समोर आले आहे.या घटनेअंतर्गत पोलिस अधिक तपास करत आहे.