शेतकऱ्यांचा उलगुलान मोर्चा (संपादित प्रतिमा)

Ulgulan Kranti Morcha: वनाधिकार कायदा , स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या, कर्जमाफी याप्रामाणेच इतर अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. सोमय्या मैदानावर बुधवारी दाखल झालेला हा मोर्चा गुरुवारी (२२ नोव्हेंबर) आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाला. ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’असे या मोर्चाला नाव देण्यात आले असून, या मोर्चात हजारो अदिवासी आणि शेतकरी सहभागी झाले आहेत. आज पाहटे साडेचारच्या सुमारास मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघाला. राज्यभरातील विविध भागातून शेतकरी बहुसंख्येने या मोर्चात सहभागी झाले आहेत.आपल्या मागन्या मान्य करा अन्यथा आपण आझाद मैदानातच ठिय्या मांडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

राज्याची राजधानी मुंबईमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. अधिवशेन काळात विविध विधयके पारित होतात. कायदे केले जातात. तसेच, राज्यातील विविध प्रश्न, समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचाही निर्णय केला जातो. त्यामुळे आपल्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी अचूक वेळ साधली आहे. दरम्यान, शेतकरी मोर्चा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी यापूर्वीही विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी नाशिक ते मुंबई असा शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत मोर्चा काढला होता. तेव्हाही लक्षवधी शेतकरी मुंबईत सहभागी झाले होते. त्या वेळी सरकारने दिलेल्या अश्वासनानंतर मोर्चा मागे घेण्यात आला होता. दरम्यान, या अश्वासनांची पूर्तता न झाल्याने तसेच, न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी ठाणे येथे जमले. त्यानंतर त्यांनी मोर्चा काढला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शेतकरी आणि आदिवासी पुन्हा मोठय़ा संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. उन्हाळी अधिवेशनापूर्वी मार्च महिन्यात नाशिकवरून मुंबईत पायी आलेल्या शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या मोर्चाने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या होत्या. मात्र, त्या मागण्यांना न्याय न मिळाल्याने बुधवारी शेतकरी आणि आदिवासी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले. हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून हा मोर्चा गुरुवारी मंत्रालयावर धडकणार आहे. प्रामुख्याने ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्य़ातील आदिवासी आणि मराठवाडय़ातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत.