UBT | Twitter

भाजपा ला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आता कंबर कसली आहे. जून महिन्याच्या सुरूवातील राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मविआ च्या सभांचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आज मविआच्या नेत्यांनी वाय बी चव्हाण सेंटर मध्ये बैठक घेतली. यावेळी अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह मविआ च्या महत्त्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करताना अचानक एकाने 'देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो' अशी घोषणा दिली. या घोषणेवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तिथल्या तिथेच आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवारांना (Sharad Pawar) पंतप्रधान बनवण्यास हरकत नाही. पण आधी सगळ्यांनी एकत्र येऊन लढा. आपल्याच तंगड्या एकमेकांमध्ये नको अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना मविआचे आम्ही नेते एकत्र भेटत असतो पण तुम्ही कार्यकर्त्यांनीही गाव पातळीवर एकत्र यायला हवं. ग्रामपंचायती, सोसायट्यांच्या निवडणूकांमध्येही भाजपाशी युती नको. नाहीतर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूका या लोकशाहीतील शेवटच्या निवडणूका ठरतील आणि हुकूमशाही सुरू होईल. नक्की वाचा: Uddhav Thackeray Statement: महाराष्ट्र मोदीजींनी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला, उद्धव ठाकरेंची टीका .

दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उत्तम चेहरा आहेत अशी प्रतिक्रिया दिली होती. पण आज उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान पद ही मोठी गोष्ट आहे. आधी गाव पातळीवर एकत्र या. तसंच स्वतःला, पक्षाला सध्या काहीही मिळालं नाही तरी चालेल पण या देशाची लोकशाही वाचली पाहिजे त्यासाठी एकत्र या असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.