उद्धव ठाकरे सहपरिवार ( फोटो सौजन्य- ट्विटर )
शिवसेना पक्षप्रमुखांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर असताना राममंदिर प्रकरणी सरकारला अल्टिमेटम दिला आहे.तर अजून राममंदिरासाठी किती दिवस वाट पाहावी लागेल असे म्हणाले. तसेच  मंदिर उभारणीची तारीख सांगा अशा शब्दात सकारवर टीका केली आहे.
अयोध्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी सकाळी 9 वाजता राम जन्मभूमीत रामलल्लांच दर्शन घेतले आहे. तर आयोध्या नगरीत सर्वत्र जय श्री रामच्या घोषणा केल्या जात आहेत. या राममंदिर प्रकरणी सर्व शिवसैनिक  आणि भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच आज 11 वाजता उद्धव ठाकरे पत्रकारांशी हिंदी भाषेतून संवाद साधणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून रहिले आहे. ( हेही वाचा - अयोध्या दौरा : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेने कायदा करावा; उद्धव ठाकरेंचे मोदी सरकारलाअल्टिमेटम )

तर शनिवारी सर्वोच्च न्यायालाच्या निर्णयाआधी संसदेने कायदा करावा असा अल्टिमेटम शिवसेना पक्षप्रमुखांनी मोदी सरकारला दिला आहे. 'मी राजकारण करायला इथे आलेलो नाही, तर झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला आलो आहे. हिंदूंनी आणखी किती काळ राम मंदिराची वाट पाहायची. आता हिंदू मार खाणार नाही, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. त्याचप्रमाणे आता हिंदू स्वस्थ बसणार नाही. मंदिर कधी उभारणार, हा प्रश्न तो विचारणारच. मंदीर व्हावे ही प्रत्येक हिंदूची इच्छा, राम मंदिराचा अध्यादेश आणणार असाल तर माझा पक्ष शिवसेना नक्की समर्थन देणार.' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला ठणकावले.