Nawab Malik (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (ShivSena NCP-Congress) तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करतील असे वातावरण निर्माण झाले होते. यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी भाजपसोबत हात मिळवणी करुन खळबळजनक परस्थिती निर्माण केली होती. त्यानंतर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. राज्याला महाशिवआघीडीचे सरकार मिळणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत, असेही नवाब म्हणाले त्यावेळी म्हणाले आहेत.

एएनआयचे ट्वीट-