शिवसेना पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा (Shivsena to form new government) आज राज्यपालांकडे केला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आणि याची अधिकृत घोषणा काहीच वेळात पत्रकार परिषद घेऊन शिवसेना करणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेमध्ये पाठिंबा दिल्याने शिवसेना हा दावा करण्यात यशस्वी ठरली आहे. एबीपी माझा या वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, new chief minister of Maharashtra) यांच्या नावावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सहमती दर्शवली आहे.
तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. हा शपथविधी नक्की कुठे होणार हे सांगण्यात आलं नसलं तरी शिवतीर्थावर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना एक अनुभवी चेहरा मुख्यमंत्री पदासाठी हवा होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावं अशी मागणी दोन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री? वाचा सविस्तर
दरम्यान शिवसेना आमदारांनी सत्ता स्थापनेच्या जल्लोषाला सुरुवात देखील केली आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याची पत्रे शिवसेनेला फॅक्सद्वारे पाठवण्यात आली आहेत.