Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: अजित पवार यांच्यामुळे मिंदे यांच्या 'नाकी नऊ' आले; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात
Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक होत भारतीय जनता (BJP पक्षावर जोरदार टीका केली. भारतीय जतना पक्षाच्या राजकारणाचा जनतेला उबग आला आहे. त्यामुळे जनता संतप्त आहे, असे सांगतानाच ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही जोरदार टीका केली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करत सत्तेत प्रवेश केला. अजित पवार गटाच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता 'पुन्हा एकदा मिंदे यांच्या नाकी नऊ आले', अशी मिष्कील टीप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे गटातील आमदार पुन्हा संपर्कात असल्याच्या चर्चेबातब विचारले असता उद्धव ठाकरे यांनी गूढ कायम ठेवले. जर कोणी संपर्कात असेल तर ते असे उघड का सांगू? असे सांगतानाच अशा चर्चा रात्रीच्या वेळी हुडी घालून करायच्या असतात, असा टोलाही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना लगावला. हे सगळे भाजपसोबत गेलेले लोक काही पवित्र आहेत का? भाजपचे अनेक लोक विरोधकांवर टीका करताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. त्यांच्या कुटुंबीयांना भ्रष्टाचारी म्हणून कलंकीत करतात आणि पुन्हा त्यांनाच मंत्रिमंडळात घेतात. तेव्हा तो कलंक नसतो का? असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. (हेही वाचा, Uddhav Thackeray Press Conference: भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणे कलंक नाही? उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल)

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच पुणे येथे येत आहेत. यावरुनही भाजपवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरे म्हणाले. लोकमान्य टीळक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, या पुरस्कारवितरणावेळी व्यासपिठावर उपस्थित असणारी मंडळी कोण असणारआहेत? ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोपक केले, तेच लोक व्यासपीठावर असणार आहेत ना? मग एका बाजूला आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे हा काय प्रकार आहे? म्हणजे भाजप ठरवेल तो सुसंस्कृत आणि भाजप ठरवेल तो कलंकीत, असे म्हणायचे काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.