शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारची पोलखोल म्हणाले 'सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे थोतांड'
Uddhav Thackeray | (Photo Courtesy: facebook / ShivSena)

Uddhav Thackeray in a Beed: कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकऱ्याला जाहीर सभेवेळी व्यासपीठावर आणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी सरकारच्या कर्जमाफी योजना घोषणेची पोलखोल केली. या शेतकऱ्याकडे कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र होते. मात्र, या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नव्हती. या शेतकऱ्याने जाहीर व्यासपीठावरुन उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यान तसे सागितलेसुद्धा. उद्धव ठाकरे हे आज मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात जाहीर व्यासपीठावरुन बोलतना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख न करता सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

दुष्काळ पडल्यानंतर सरकारला दुष्काळ दिसायलाही यंत्रणा लागते. मला यंत्रणा लागत नाही. समोरची जनता हीच माझी यंत्रणा. केंद्रातील पथक दुष्काळ पाहण्यासाठी आले. हे पथक येऊन गेले मात्र, शेतकऱ्याच्या हाती, जनतेच्या हाती काहीच मिळाले नाही. हे पथक बँन्जो पथक होते की, लेझीम पथक होते. सरकार केवळ कर्जमाफी घोषणेचं गाजर दाखवतं आहे. पण, यांच्याकडे गाजर वाटण्याचीही दानत नाही, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर नाव न घेता केला. अनेकांना वाटतं मला शेतीतील कळत नाही. ठिक आहे, मला नसेल कळत शेतीतील. पण, मला जनतेच्या, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आश्रू दिसतात, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकरी फसल योजना नव्हे, फसाल योजना

केंद्र सरकारडून राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी फसल योजनेची फसाल योजना अशी संभावना करत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकार नुसतं घोषणा करतंय. महाराष्ट्राला कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचं सांगितलं जातंय. प्रत्यक्षात मात्र काही दिले जात नाही. शेतकऱ्यांच्याही हाती काही लागले जात नाही, असे उद्धव या वेळी म्हणाले. (हेही वाचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा; पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला प्रत्युत्तर?)

शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्या, युतीची बोलणी गेली खड्ड्यात

दरम्यान, मला शेतकऱ्याला कर्जमुक्ती महत्त्वाची आहे. शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यापुडे युतीची बोलणी गेली खड्ड्यात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुनही सरकारला लक्ष्य केले. मंदिर वही बनायेंगे लेकीन तारिख नही बतायेंगे अशी टीका करत  भाजप, आरएसएस आणि सरकारकडून मंदिराबाबत दिल्या गेलेल्या अश्वासनांची खिल्ली उडवली. याच वेळी पहिले मंदिर फिर सरकार अशा घोषणेचा पुनरुच्चार केला.