शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा; पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला प्रत्युत्तर?

पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते आपापल्या पक्षाचे शिर्ष नेतेही आहेत. त्यामुळे आपल्या नेत्यांच्या सभांना गर्दी व्हावी यासाठी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून प्रयत्न होत आहेत. आगामी राजकरणासाठी शक्ती प्रदर्शनही या निमित्ताने केले जाणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा; पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला प्रत्युत्तर?
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि नरेंद्र मोदी, पंतप्रधान | (Photo courtesy: archived, edited, representative image)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) आजपासून (9 जानेवारी) मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त (Marathwada in Drought) भागाची पाहणी करतील. तसेच, सरकारकडून शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना झाला किंवा नाही याचीही चौकशी करत ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात प्रामुख्याने ते औरंगाबाद, बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यांना भेट देतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा आजच महारष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोलापूर (Pm Modi Rally in Solapur) येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि त्यांची जाहीर सभा यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय असणार आहे याकडेही महाराष्ट्रचे लक्ष आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते आपापल्या पक्षाचे शिर्ष नेतेही आहेत. त्यामुळे आपल्या नेत्यांच्या सभांना गर्दी व्हावी यासाठी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून प्रयत्न होत आहेत. आगामी राजकरणासाठी शक्ती प्रदर्शनही या निमित्ताने केले जाणार आहे. (हेही वाचा, NDA ही कोणा एकाच पक्षाची जहागिरी नाही, शिवसेनेचा भाजपवर वार)

उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा, दिवसभरातील कार्यक्रम

  • विशेष विमानाने सकाळी अहमदनगर येथे उद्धव ठाकरे यांचे आगमन. त्यानंतर बीडला रवाना.
  • सकाळी 10 वाजता - बीड तालुक्यातील म्हाळस येथे शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप. पुढे दुष्काळ पाहणीसाठी रवाना
  • सकाळी 11 वाजता - आशीर्वाद लॉन्सवर होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन
  • बीड येथील सभा आटोपल्यावर अहमदनगरला परतणार. दरम्यान, जालना व बदनापूर येथे शेतकऱ्यांसोबत संवाद
  • दुपारी 2 वाजता - बदनापूर येथे चाणक्य मंगल कार्यालयात दुपारी 3 वाजता ते शेतकऱ्यांशी संवाद

दरम्यान, दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना पक्षपातळीवर मदत करणार आहे. 'दुष्काळग्रस्तांना मदत' या मोहिमेसाठी शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना 100 ट्रक पशूखाद्य धान्य, पाण्याचे ट्रँकर आदी वस्तूचे वाटप केले जाणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2019 08:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).