Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Uddhav Thackeray On Shinde Government: शिवसेनेतील ठाकरे गट महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारवर सतत हल्लाबोल करत आहे. नुकतेच राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले आहे. यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना पाहून ठाकरे गटाकडून ‘50 खोके...एकदम ओके’चा नारा दिल्याचा आरोप होत आहे. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही या वादात उडी घेतली आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे खोके येत आहेत. या खोक्याच्या आत काय आहे हे पाहिलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेच्या भावना आमच्या पाठीशी आहेत. निवडणुका कधी येतील आणि आपण या देशद्रोह्यांना धडा शिकवू, याची लोक वाट पाहत आहेत. पण निवडणुका लवकर घेण्याची हिंमत त्यांच्यात आहे, असे मला वाटत नाही. मग निदान या निमित्ताने तरी जनभावना आमच्यात सामील व्हायला हवी. (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; उद्या कोर्टात व्हायचं ते होईल, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास - उद्धव ठाकरे)

उद्धव ठाकरे शिवसैनिकाला संबोधित करताना म्हणाले की, "म्हणूनच मी पुन्हा हात जोडून विनंती करतो की, आज तुम्ही सुरुवात केली आहे. माझा विश्वास आहे पुढच्या वेळी तुम्ही याल तेव्हा 5, 15, 20 निष्ठेचे खोके घेऊन येताल. नाहीतर आत मिडीयाचे लोक आहेत. ते म्हणतील की, इथेही खोके येतात. पण हे खोके कशाचे आहेत, ते एकदा खोलून पहा. यात शिवसैनिकांची निष्ठा आहे आणि ही निष्ठा मी आदराने स्वीकारतो.