CM Devendra Fadanvis, Uddhav Thackeray (Photo Credits: File Image)

महायुतीची औपचारिक घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

निवडणुकांसंदर्भातील अनेक महत्त्वाच्या बाबींवर फडणवीस यांनी भाष्य केले तसेच शिवसेना आणि भाजप यांच्यात अनेक मतभेद असल्याचेही सांगितले. सभेदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, "दोन्ही पक्षांमध्ये मतभेद तर आहेत परंतु हिंदुत्व हा एकमेव धागा आहे जो आम्हाला एकत्रित बांधून ठेवतो."

बंडखोरी करणाऱ्यांना खडे बोल लगावत फडणवीस म्हणाले, "शिवसेना विरुद्ध भाजप असे अनेक ठिकाणी उमेदवार अर्ज भरण्यात आले आहेत. तर अशा बंडखोरांना आम्ही अर्ज मागे घ्यायला सांगणार आहोत. जर कोणी तसं केलं नाही तर त्या बंडखोरांना महायुतीत स्थान दिलं जाणार नाही. तसेच महायुती त्यांना त्यांचं काय स्थान आहे ते दाखवून देईल."

एकनाथ खडसे, विनोद तावडे यासारख्या अनेक बड्या नेत्यांना भाजप मधून तिकीट मिळालं नाही. त्यावर बोलताना मुख्यानमंत्री म्हणाले, "पक्षात प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या बदलत असतात. त्यांच्याही जबाबदाऱ्या आता बदलल्या आहेत, इतकंच मी म्हणेन."