साता-याचे उदयनराजे भोसले 32,000 मतांनी पिछाडीवर, पक्षबदल करणे पडू शकते महागात
Udayanraje Bhosale | (Photo credit: archived, edited, representative image)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या तिकिटावर विद्यमान खासदार म्हणून निवडून येण्याला अवघे शंभर दिवस पूर्ण होत असतानाच उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजप प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का होता. मात्र धक्क्यातून NCP बाहेर पडत आज मतमोजणीत NCP ने चे उदयनराजे भोसलेंना मोठा धक्का दिला आहे. यात आतापर्यंत झालेल्या फेरीत साता-यातील उदयनराजे भोसले हे तब्बल 32,000 मतांनी पिछाडीवर आहेत. उदयनराजेंचे पक्षबदल करणे खूप महागात पडू शकते अशी शक्यता या सद्य परिस्थितीवरुन दिसून येत आहे.

उदयनराजे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी उदयनराजे यांच्यावर टिका केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीतर्फे अखेर श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

हेदेखील वाचा- भाजपला धक्का: काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो

विद्यमान खासदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्याविरोधा आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत गेली प्रदीर्घ काळ चर्चा आणि उत्सुकात होती. सुरुवातीच्या काळात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव चर्चेत होते. परंतु, श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

इतक्या फरकांनी पिछाडीवर असणे हे केवळ उदयनराजें साठी नव्हे तर भाजपासाठी देखील चिंतेची बाब आहे असे स्पष्ट दिसून येतय. परंतू तरीही अंतिम निकाल हे चित्र बदलू शकेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.