
लखनऊच्या एससीएसटी कोर्टरूममध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात गुंड संजीव माहेश्वरी उर्फ जीवा ठार झाला. पण गोळीबारात दोन पोलीस, दीड वर्षाची मुलगी आणि तिची आई यांनाही गोळी लागली. गोळीबारात जखमी झाल्यानंतर सर्वांवर केजीएमयू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी सीएम योगी केजीएमयू हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी लोकांची भेट घेतली.
बुधवारी दुपारी लखनऊच्या एससीएसटी कोर्टरूममध्ये वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोराने गोळीबार केला. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हल्लेखोराने कुख्यात गुन्हेगार आणि माफिया मुख्तारचा अत्यंत जवळचा गुंड संजीव माहेश्वरी उर्फ जीवा (50) याची हत्या केली. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH लखनऊ: उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने किंग जॉर्ज मेडिकल यूनिवर्सिटी (केजीएमयू) ट्रॉमा सेंटर का दौरा किया और लखनऊ कोर्ट फायरिंग के घायल पीड़ितों से मुलाकात की। pic.twitter.com/bwkF9PySGF
— ANI_HindiNews (@AHindinews) June 8, 2023