Pune Accident: पुण्यात रस्ता अपघाताची मालिका सुरु आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यात रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे सासवड येथील रस्त्यावर दोन दुचाकींचा धडकेत भीषण अपघात झाला. धडक एवढी मोठी होती की, दोघे जण जागीच मृत्यू झाला. तर घटनेत तीन जण जखमी झाले. ही पुण्यात शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. पुरंदर पोलिस ठाण्यात या अपघाताची माहिती घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चंद्रकांत दानवले हे शुक्रवारी सांयकाळी त्यांच्या बाईकने परिंचे कडून सटलवाडी येथे जात होते. तर संयज नानगुडे हे सटलवाडी कडून जात होते. पोलदरा येथील रस्त्यावर दोन बाईक एकमेकांना धडकल्या. या धडकेत सर्वजण बाईकवरून खाली पडले. दोघांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, दोन बाईकच्या धडकेत भीषण अपघात झाला. या धडकेत दोन्ही बाईक दूरवर फेकल्या गेल्या. संजय नानगुडे (२६) चंद्रकांत दानवले (५०) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे. शेकर घोडके, प्रतिक अनिल खोमणे (वय २५), आकाश रोहिदास समगीर (वय २४) अशी या अपघातात जखमी तिघांची नावे आहेत. हे सर्व जण पुरंदर तालुक्यातील रहिवासी आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमी लोकांना ससून रुग्णलयात दाखल केले