रेल्वेच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेले बछडे (Photo Credit : ANI)

चंद्रपूर जिल्ह्यात जुनोना-मामला मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघीणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हे दोन्ही बछडे सहा ते आठ महिन्यांचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसंच हे दोन्हीही मादी बछडे होते.

वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. 410 आणि कक्ष क्र. 477 भागातून हा रेल्वे मार्ग जातो. सकाळी भ्रमंतीच्या वेळेस आईसोबत हे दोन्ही बछडे निघाले असावेत आणि रेल्वेच्या धडकेत मृत पावले असावेत, असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे अधिकारी ऋषिकेश रंजन, विभागीय वनाधिकारी दावडा, सोनकुसरे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेचे मुकेश भांडारकर घटनास्थळी पोहचले.

आजचं टी1 वाघिण अवनीच्या दोन्ही बछड्यांचा शोध लागला आणि चंद्रपूरात दोन्ही बछड्यांनी आपला जीव गमावला.