सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) परिस्थितीमध्ये रुग्णालयांचा मनमानीपणा तसेच अतिरिक्त पैसे लाटण्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशात राज्य शासनाने ठाणे (Thane) जिल्ह्यातील कोविड-19 बाबत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल, जिल्ह्यातील दोन रुग्णालयांना 16 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महाराष्ट्र कोविड-19 नियम व साथीचा रोग अधिनियमांतर्गत हा दंड ठोठावला आहे. याआधी या रुग्णालयांना अनेक वेळा इशारा देण्यात आला होता, असे महाराष्ट्र महानगरपालिका ठाणे जिल्हाचे (TMC) उप महानगरपालिका आयुक्त विश्वजित केळकर (Vishwanath Kelkar) यांनी सांगितले. प्रत्येक रुग्नामागे 1 लाख असा हा दंड आकाराला आहे.
याबाबत डीएमसीने सांगितले की. ‘कोविड-19 बाबतच्या गंभीर रूग्णांना (Critical COVID-19 Patients) या दोन रुग्णालयांमध्ये ठेवले होते. ही रुग्णालय अशा रूग्णांसाठी नाही, ज्यांनी एकतर या विषाणूची लक्षणे दाखविली नाहीत (Asymptomatic) किंवा ज्यांना सौम्य लक्षणे (Mild Symptoms) आहेत. या रुग्णालयांनी रुग्णांना निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ ठेऊन घेतले. त्यामुळे दोन्ही रूग्णालयांना रूग्णाप्रती एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. एका रुग्णालयात 13 लाख रुपये, तर दुसर्या रुग्णालयात 3 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.’
(हेही वाचा: महाराष्ट्रात आज कोरोनाच्या नव्या 3007 रुग्णांची भर तर 91 जणांचा बळी, राज्यातील COVID19 चा आकडा 85 हजारांच्या पार)
यापूर्वीही, नागरी संस्था प्रमुखांनी कामावर हजार न राहणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. ठाणे हे राज्यातील कोविड-19 बाबत सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक आहे. याठिकाणी शनिवारी आणखी 152 जणांची सकारात्मक चाचणी झाली. सध्या, इथे 2012 लोक उपचार घेत आहेत, तर 46 टक्के (1670) लोकांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, राज्याबद्दल बोलायचे झाले तर, महाराष्ट्रात आज कोरोनाचे सर्वाधिक 3007 नव्या रुग्णांची भर पडली असून 91 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 85 हजारांच्या पार गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.