Coronavirus | Photo Credits: Pixabay.com

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सरकारने येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश जाहीर केले आहे. परंतु लॉकडाऊन 5.0 मध्ये नियमात शिथीलता आणण्यासोबत काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु त्यानंतर आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये अधिकच भर पडत असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्रात आज कोरोनाचे सर्वाधिक 3007 नव्या रुग्णांची भर पडली असून 91 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 85 हजारांच्या पार गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची नवी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 85,975 वर पोहचला असून एकूण 3060 जणांचा बळी गेला आहे. तसेच कोविड19 चे राज्यात 43591 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाची साखळी अद्याप तुटलेली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तसेच नागरिकांनी आता घराबाहेर पडताना सर्वतोपरी काळजी घ्यावी असे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे.(Coronavirus Home Quarantine Guidelines: कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींसाठी घरी विलगीकरण करण्याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर)

दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. राज्यात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या Unlock 1 नुसार दुकाने सुरु करण्यासह नागरिकांना आता घराबाहेर पडण्यासाठी वेळा ठरवून दिल्या आहेत. तर आता उद्यापासून राज्यात धार्मिक स्थळ, ऑफिसे आणि बस सेवा सुरु होणार आहे.