Pune Firing Case: बुधवारी रात्री सिंहगड कॉलेज परिसरात (Sinhagad College Area) एका 21 वर्षीय तरुणाने ऑनलाइन मोबाईल गेम (Online Mobile Game) खेळत असताना झालेल्या वादानंतर त्याच्या मित्रावर गोळीबार (Firing) केला. ही घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत असलेल्या कॉलेजजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. आरोपीची ओळख पटली असून निलेश जाधव, असं या आरोपीचं नाव आहे. तो दाभाडीचा रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, निलेश जाधव आणि त्याचा मत्र करण गर्जमल हे एका मोकळ्या जागेत ऑनलाइन गेम खेळत होते. यादरम्यान, चेष्टा-मस्करीतून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर निलेश जाधवने कथितपणे देशी बनावटीच्या पिस्तूलचा वापर करून करण गर्जमल (वय,19) याला गोळी मारली. गोळी गर्जमलच्या खांद्यावर लागली. गर्जमलवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जिथे डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. (हेही वाचा -Baramati Shocker: अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी आपल्या 9 वर्षाच्या मुलाची केली हत्या; भिंतीवर डोके आपटून गळा आवळला, बारामतीजवळील धक्कादायक घटना)
घटनास्थळावर सापडले रिकामे काडतूस -
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरून एक रिकामे काडतूस सापडले. तरुणाकडे गावठी कट्टा (बंदुक) कुठून आले याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी आरोपी निलेश जाधवला अटक केली असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या 17 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा: Raigad Shocker: पेणमध्ये ड्रग्जच्या वादातून 14 वर्षीय वर्गमित्राची हत्या; मृतदेह झुडुपात फेकला)
तपास सुरू -
पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण विक्रीशी संबंधित कामांमध्ये सामान्य कामगार म्हणून काम करतात. याशिवाय, त्यांचे पालक रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत. या धक्कादायक घटनेनंतर सिंहगड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.