 
                                                                 Raigad Shocker: रायगड (Raigad) मधील पेण येथील एका 14 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याची त्याच्या 15 वर्षांच्या वर्गमित्राने ड्रग्जच्या वादातून हत्या (Murder) केली. मुलाला ताब्यात घेऊन रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. अल्पवयीन आरोपीने मुलाचा मृतदेह झुडपात फेकला होता. पेण पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून तसेच पीडित मुलाच्या चार मित्रांची चौकशी करून हत्येचा गुन्हा उलगडला.
शुक्रवारी संध्याकाळी पेण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना आंबेडकर शाळेजवळ एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. अधिक तपासात पोलिसांना आढळले की, मृत व्यक्ती पेणमधील फणसडोंगरी येथील बांगड्या विक्रेत्याचा मुलगा गणेश बाळू चुनारे आहे. रायगड पोलिसांचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी सांगितले की, आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मृत मुलगा त्याच्या दुसऱ्या मित्रासोबत शेवटचा दिसला होता असे आढळले. त्यानंतर मित्राची चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याने गणेशची हत्या केली. (हेही वाचा -Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख च्या कुटुंबीयांनी घेतली CM Devendra Fadnavis यांची भेट ( Watch Video))
मृत गणेश चुनारे हा आठवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी होता. त्याच्या मोठ्या भावाचा काही वर्षांपूर्वी अतिमद्यपानामुळे मृत्यू झाला होता. तो त्याच्या पालकांसह आणि एका लहान बहिणीसोबत राहत होता. प्राप्त माहितीनुसार, पीडित आणि आरोपी नियमितपणे ड्रग्ज सेवन करण्यासाठी शाळा बुडवायचे. ते दोघेही आठवीत शिकत होते. (हेही वाचा - Pune WNS Employee Murder: पुण्यातील बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची पुरुष सहकाऱ्याने केली हत्या)
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आणि पीडितेच्या काही जवळच्या मित्रांची चौकशी करणाऱ्या स्थानिक पेण पोलिसांनी असे निष्कर्ष काढले की, त्यांच्यात आणखी काही व्यसनाधीन पदार्थ मिळविण्यावरून तसेच पैसे मागण्यावरून जोरदार वाद झाला होता. यावेळी अल्पवयीने आरोपीने पीडित मुलाच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तूने वार केले. नंतर, त्याचा मृतदेह एका निर्जन जागेत फेकून दिला.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
