Marathwada Earthquake: नांदेड, परभणी, हिंगोली मध्ये पहाटे 4.2 रिश्टल स्केलचा भूकंप; दोनदा हादरलं हिंगोली!
Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

मराठवाडा (Marathwada) मध्ये भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी 6 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टल स्केल असल्याचं सांगण्यात आले आहे. हा भूकंप नांदेड (Nanded), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli) मध्ये जाणवला आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेक जण घाबरून घराबाहेर पडले.

हिंगोली जवळ भूकंपाचे केंद्र असल्याचं समोर आलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवघ्या 10 मिनिटामध्ये 2 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. एक 3.6 तर दुसरा 4.5 रिश्टल स्केलचा भूकंप होता. तर केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर आहे. काही ठिकाणी भूकंपाच्या धक्क्यामुळे घरांना सौम्य प्रमाणात भेगादेखील गेल्या आहेत. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना देखील तडे गेल्याचं समोर आलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोली आजमध्ये  सकाळी 6 ते 6.10 दरम्यान हिंगोली, वसमत, औंढा व कळमनुरी मध्ये भूकंप जाणवला आहे.

पहा ट्वीट

पहा भूकंपाचा व्हिडिओ

भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने या भागामध्ये कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येही अशाच प्रकारे भूकंपाचे धक्के जाणवले होते. Hingoli Earthquake: हिंगोली मध्ये पहाटे जाणवले भूकंपाचे धक्के .

भूकंप जाणवला तर तात्काळ मोकळ्या जागी/ मैदानावर या. इमारतीमध्ये असल्यास मोठ्या फर्निचरच्या खाली आसरा घ्या. ढिगार्‍यामध्ये अडकल्यास जवळच्या जवळच्या वस्तूवर (पाईप/भिंत) यावर हात मारत रहा. हालचाल करण्याचा प्रयत्न करू नका.