Chandrapur Crime: चंद्रपूर जिल्ह्यात पोटच्या मुलींची आणि पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना नागभिड तालुक्यातील मौशी गावात घडली आहे. या भयंकर घटनेने गावात शोककळा पसरली आहे. पतीने पत्नीची आणि दोन मुलींची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला अटक केले आहे. कौटुंबिक वादातून आरोपीने तिघांची हत्या केल्याचे समोर आले आहे. ( हेही वाचा- दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईची हत्या, दारूड्या मुलाला अटक,)
मिळालेल्या माहितीनुसार, दररोज कुटुंबात घरगुती वाद होत असायचे.याच भांडणाच्या रागातून रात्री सर्व झोपेत असताना, आरोपीने तिघींवर कुऱ्हाडीने वार करून संपुर्ण कुटुंब संपवले आहे. अंबादास तलमले (वय वर्ष ५०) असं आरोपीचे नाव आहे. पत्नी अल्का तळमले (वय ४०), मोठी मुलगी प्रणाली तलमले, (वय,१९) आणि छोटी मुलगी तेजू तलमले (वय, १७) या तिघांची हत्या केली.
गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला अटक केले आहे. गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दररोज कुटुंबात वाद होत असायचा अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. आरोपींने रात्री सर्वजण झोपेत असताना, कुऱ्हाडीने वार करून तिघांना गंभीर जखमी केले. गंभीर जखमींमुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला.