महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उत्सव हा शिवभक्तांसाठी एक मोठा सण असतो मात्र यंदा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये (Trimbakeshwar) काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. वेतनवाढीच्या मागणीवरून देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका आज भक्तांना बसला आहे. आज भक्तांसाठी मंदिर खुले असले तरीही काही कार्यक्रमांना रद्द करावे लागले आहे. आज तुंगार मंडळी ट्रस्टचे कर्मचारी, बचत गटांच्या महिला, काही सेवाभावी युवक, पुरोहित संघाचे कार्यकर्ते याशिवाय स्वतः विश्वस्त मंडळाचे सदस्य गर्दीचे नियोजन करत आहेत. प्रोटोकॉल वगळता व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्यात आली आहे. Maha Shivratri 2019: महाशिवरात्रीला भेट द्या शंकराच्या पावन महाराष्ट्रील या ज्योतिर्लिंगांंना; पहा वैशिष्ठ्ये
त्र्यंबकेश्वर मंदिराचं आकर्षण
महामृत्युंजय भगवान शिवाचे अधिष्ठान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये असल्याचे समजले जाते. हे ज्योतिर्लिंग स्वयंभु ज्योतिर्लिंग आहे. पिंडीवर शाळुंका ऐवजी अंगठ्याच्या आकाराचे तीन पिंडीतील खळग्यामध्ये ब्रम्हा-विष्णू-महेश यांच्या प्रतिकृती म्हणुन तीन लिंगे आहेत. महाशिवरात्रीदिवशी येथे भाविक मोठी गर्दी करतात.
यंदा कशी आहे सोय?
मंदिर भाविकांना 24 तास खुले असेल.
पहाटे पासून दुपारी 12.30 आणि सायंकाळी 6.00 वाजेपासुन ते दुसऱ्या दिवशी दि. 5 मार्चपर्यंत दुपारी 12.30 पर्यंत दर्शन घेता येईल.
ओळखपत्र दाखवूनच मंदिरामध्ये प्रवेश दिला जाईल.
भाविकांना दर्शन घेण्याच्या दृष्टीने मंदीराचे पुर्वेकडील गेटमधुन धर्मदर्शन भाविकांना 24 तास खुले असेल.
महाशिवरात्रीनिमित्त भगवान त्र्यंबक राजाची पालखी दुपारी 2.30 वाजता निघणार आहे.
महाशिवरात्रीचा दिवस भाविकांसाठी खास असल्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये यंदा विशेष सोय करण्यात आली आहे.