बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. त्र्यंबक मंदिर हे ऐतिहासिक मंदिर असुन या मंदिरच्या बांधकामास शेकडो वर्ष पुर्ण झाली आहेत. तरी मंदिर संरक्षण आणि संवर्धनाच्या पार्श्वभुमिवर मंदिराच्या देखभालीचं काम करण्यासाठी बंद ठेवण्यात आले होते. रोज हजारोंच्या संख्येने भाविक जोतिर्लिंगाच्या दर्शनास येतात दरम्यान हे काम करण्यास अवघड होते तरी हे काम पूर्ण करण्यासाठी  ५ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान भाविकांना जोतिर्लिंगाच्या दर्शनास तसेच मंदीर प्रवेशास बंदी घालण्यात आली होती. देखभालीच्या या आठ दिवसातील कामादरम्यान मंदिर प्रशासना व्यतिरीक्त कुठल्याही व्यक्तीस प्रवेश नाकारण्यात आला होता. पण आता पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

 

त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर दर्सनासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असून आज पहाटेपासून दर्शनासाठी लांबचं लांब रांगा पाहायला मिळत आहे. गेल्या ८ दिवसांत त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिराच्या संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्त्व खात्या मार्फत करण्यात आले आहे. तरी हे डागडुजीचं काम मंदिर संवर्धनासाठी करण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तरी मंदिराच्या कामकाजानंतर आता मंदिर पुन्हा एकदा शिवशंभोच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले असुन सर्व भाविकांनी या सुचनेची नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन  त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. (हे ही वाचा:- केरळच्या Sabarimala Temple बद्दल या '11' इंटरेस्टिंग गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल!)

 

त्र्यंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याने मंदिराच्या डागडूजीचे काम करण्यात आले.  शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निघत असल्याच दिसून येत आहे. तरी हा वज्रलेप लावून केवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी देखील शिवलिंगाची झीज होत असल्याने मंदिर प्रशासनाकडून मंदिराच्या देखभालीच्या काम करण्यात आले आहे.