त्र्यंबकेश्वर मंदिर | PC: Wikipedia

भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे नाशिक (Nashik)  मधील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar)! नाशिक मध्ये आलेले अनेक पर्यटक आणि भाविक हमखास त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला येतात. पण आजपासून पुढील 8 दिवस त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या काही देखभालीच्या कामांसाठी भाविकांकरिता मंदिर बंद राहणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 5 ते 12 जानेवारी मंदिर बंद असेल. भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

मंदिरात डागडुजीच्या कामात मंदिराच्या संवर्धनाचे जे काम होणार आहे ते भारतीय पुरातत्त्व खातं कडून करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागली आहे. त्यावर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवलिंगाच्या एका बाजूने वज्रलेप आता निघू लागला आहे. 8 वर्षांपूर्वी हे वज्रलेपाचं काम झालं आहे. पण इतक्या कमी वर्षात ही झीज पुन्हा दिसत असल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. नक्की वाचा: Mask Mandate Returns to Temples: शिर्डी च्या साईबाबा ते कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पहा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कोणत्या देवस्थानांमध्ये नववर्ष निमित्त जात असाल तर मास्क सक्तीचा! 

शिवपिंडीमध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रूप आहे. मागील वज्रलेपाच्या वेळास किमान 3 दिवस त्यावर पाण्याचा मारा न करण्याचा सल्ला होता पण 3 दिवसांमध्येच पाणी मारल्यामुळे त्यावेळेस करण्यात आला वज्रलेप हा वादात आला आहे. पिंडीची होत असलेली झिज रोखण्यासाठी हा वज्रलेप केला जातो. दरम्यान पिंडीची होत असलेली झीज रोखण्यासाठी चांदीचे कवच लावण्यासही विरोध झाला आहे.