Pandharpur Vitthal Rukmini Temple (PC - Twitter)

Independence Day 2022: आज भारतात सर्वत्र 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर (Pandharpur Vitthal Rukmini Temple) तिरंगी फुलांची सजावट करून आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे श्रावणी सोमवार आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झेंडू, शेवंती आणि तुळशीच्या पानांनी देवाचा गाभारा, प्रवेश द्वार आणि सभामंडप सजवण्यात आला आहे. तिरंग्याच्या रंगाची ही आकर्षक सजावट पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले आहे. तिरंग्यामध्ये सजलेले विठ्ठू माऊलीचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली होती. (हेही वाचा - Independence Day 2022: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कोयना धरण परिसरात अनोखी रोषणाई)

दरम्यान, देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच देशभरातील ऐतिहासिक इमारतीवर तिरंग्याच्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मंदिरावरदेखील तिरंगी रंगाच्या लाईटची रोषणाई करण्यात आली आहे.