देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) आहेत. त्याच्या वापरातून पोलीस दलाने आपली कार्यक्षमता व पारदर्शकता वाढवली आहे. मुंबई पोलीस माहिती यंत्रणा, ऑटोमेटेड बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टम, एम पासपोर्ट, संवाद ऍप्स, ट्विटर हॅंडल, मोबाईल सर्व्हेलन्स वाहने यामुळे मुंबई पोलिसांच्या कामाला वेग आला आहे. यातच कोर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मोहिमेअंतर्गत (CSR Campaign) मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात सुझिकी कंपनीच्या 10 नव्या गिक्सर 250 एसएफ (Gixxer 250 SF) स्पोर्ट्स बाईक सामील झाल्या आहेत. ज्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांना अधिक फायदा मिळणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
मुंबई पोलीस दलातील वाहतूक विभाग हा महत्वाचा घटक आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे, बेशिस्त चालकावर कारवाई करणे, वाहन अपघात, नैसर्गिक दुर्घटना घडल्यावर त्या परिसरातील वाहतूक कोंडी होऊ नये, याची वाहतूक पोलीस खबरदारी घेत असतात. म्हणूनच मुंबई वाहतूक पोलीस दलात आता कोऱ्या 250 सीसी स्पोर्ट्स बाईक सामील झाल्याने त्यांना अधिक फायदा होऊ शकतो. सध्या वाहतूक पोलिसांना 10 दुचाकी देण्यात आल्या आहेत. तसेच या बाईक सहार, वाकोला, बीकेसी, वांद्रे, माहीम, दादर, वरळी, ताडदेव, मलबार हिल, विक्रोळी वाहतूक विभागाला देण्यात आली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र पोलिस दलातील तब्बल 8,232 पोलिसांना Covid-19 ची लागण तर 93 जणांचा मृत्यू
एएनआयचे ट्वीट-
Traffic Police have received 10 sports bike 'Gixxer 250 SF' under CSR (Corporate Social Responsibility) campaign. The bikes are equipped with a siren, blinker lights and other advance systems: DCP Traffic Ranjan Kumar Sharma, Mumbai pic.twitter.com/xUvl2qJ2Dm
— ANI (@ANI) July 25, 2020
या बाईकचे वैशिष्ट म्हणजे, त्या उचीला कमी असून पळण्यात तेज आहेत. याशिवाय त्यात डिस्क ब्रेक, सेल्फ स्टार्ट, माईक सिस्टम, ब्लिकर लाईट, सामान ठेवण्यासाठी सुविधा या दुचाकीमध्ये देण्यात आले आहेत.