पोलिसांवर हल्ला (Attack on Traffic Police) झाल्याच्या अनेक घटना राज्यभरात घडत आहेत. राज्यात लॉकडाऊन आणि कर्फ्यू असतानादेखील पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांवरील हल्ल्यांचे हे सत्र अजूनही सुरूच असून कल्याण (Kalyan) येथून आणखी एक घटना उघडकीस आली आहे. नाकाबंदीदरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडवले म्हणून दुचाकीस्वराने पोलिसावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी दुचाकीस्वराला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर, जखणी पोलिसाला रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये दाखल केले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राहुल रोकडे असे दुचाकी स्वराचे नाव आहेत. तर, प्रकाश पटाईत असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान, कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ शुक्रवारी पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. या ठिकाणी प्रकाश पटाईत आपले कर्तव्य बजावत होते. तिथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु होती. त्यावेळी राहुल रोकडे भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात होता. त्यावेळी पटाईत यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुलने कट मारून तिथून निघून गेला आहे. हे देखील वाचा-Corona Virus Update: मुंबईत बनावट लस करून भरवले शिबीर, प्रकरणात 13 जणांना केली अटक
त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर राहुल पुन्हा पटाईत यांच्याकडे आला आणि हुज्जत घालू लागला. दरम्यान, रस्त्यावरील दगड उचलून तो पोलिसांवर धावून गेला. मात्र, इतर पोलिसांनी त्याला समजावले. त्यानंतर या तरुणाने स्वत:ला जखम करुन घेतल्याने पोलिसांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या अवस्थेत रोकडेने पटाईत यांच्या डोक्याला दडगाने जखम केली. यामुले पटाईत यांना इतर सहकाऱ्यांनी ताबडतोब रुक्णिणीबाई रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपाचार सुरु आहे. याप्रकरणी आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.