लोणावळ्यात (Lonawala) वीकेंडनिमित्त पुन्हा पर्यटकांची गर्दी झाली असल्याचे पहायला मिळत आहे. सर्वांच्या आवडीचे ठिकाण असलेल्या भुशी धरणावर (Bhushi Dam) सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी झाल्याचं देखील चित्र आहे. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे पोलिसांचे टेंशन वाढले आहे. कारण काही पर्यटक जीवावर बेतणारे पर्यटन करत होते. भुशी धरणात काही पर्यटक जीव धोक्यात घालून पोहत होते. अस असलं तरी भुशी धरणावर लोणावळा शहर पोलीस (Lonawala Police) दिसले नाहीत. पर्यटकांनी अशा प्रकारे जीवावर बेतणारे पर्यटन करू नये असे वारंवार आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. तरीही काही पर्यटक सर्व नियम झुगारून अशा प्रकारे पर्यटन करताना दिसत आहेत. (हेही वाचा - Car Plunges In Dam: वरवंड गावाजवळील नीरा-देवघर धरणात कार बुडली; 2 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता)
आज विकेंड असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. भुशी धरणासह लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. भुशी धरण, टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट धुक्यात हरवल्याचे चित्र होतं. या धुक्याचा आनंद घेण्यासाठी राज्यासह परराज्यातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. लोणावळ्यात पावसाचं प्रमाण कमी झाल आहे.
भुशी धरणाच्या पायऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामध्ये बसून वर्षाविहाराचा आनंद घेत आहेत.