प्रतिकात्मक प्रतिमा (Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

Car Plunges In Dam: पुण्यातील नीरा-देवघर धरणाच्या खळखळत्या पाण्यात बुडून एका 30 वर्षीय महिलेसह दोन जण बुडाले, तर एक जण जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. कारमध्ये असलेला आणखी एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे, असेही त्यांनी सांगितले. वर्षा विहारासाठी आलेले हे मित्र परिवार कार मध्ये फिरत होते. शनिवारच्या सकाळी 8.30 वाजता वरवंड गावाजवळ ही घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेतला. बचाव कार्य पथक देखील दाखल झाले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसारही घटना घडली त्यावेळी कारमध्ये एका महिलेसह चार जण प्रवास करत होते. या घटनेत अक्षय धाडे (27) आणि त्याची महिला मित्र हर्षप्रीत बाबा (30) या आयटी व्यावसायिकाचा मृत्यू झाला. अक्षय धाडेचा दुसरा मित्र, स्वप्नील शिंदे याचा शोध लागला नाही, असे पोलिसांनी सांगितले. "कारमध्ये असलेला आणखी एक व्यक्ती, ज्याचे नाव संकेत जोशी आहे, मात्र या घटनेतून वाचण्यात यश आले आणि त्याला किरकोळ दुखापत झाली," असे पोलिसांनी सांगितले. जखमीला रुग्णालयात हलवण्यात आले असून, बेपत्ता व्यक्तीचा अद्यापही शोध सुरू आहे.

परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांचा धरणांत कार बुडली. या कार मध्ये असलेली 35 वर्षी महिलेसह दोन जण बुडाली. कार मध्ये असलेली एक व्यक्ती बेपत्ता झाली आहे. आणि एक जण गंभीर जखमेत आहे. बचाव कार्यांने एका व्यक्तीला वाचवले आहे त्याला गंभीर जखमा झाल्यामुळे रुग्णायलयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटनेची पुढील तपासणी करत आहे.