Chandrapur Flood: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं मुंबई, कोकणासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अनेक नद्या दुथडी भरून वाहतात. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाड्यात सुध्या पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे एकीकडे शेतकरी त्रस्त झाला आहे आणि दुसरी कडे काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कोकणासह विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाने हैराण करून सोडलं आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. सखल भागात देखील पाणी साचलं तर मुसळधार पावसामुळे वाहतूकीवर परिणाम झाले आहे.
परिणामी वर्धा नदीला पूर आला असून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थिती मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास २० रस्ते बंद झाले आहे. याशिवाय अनेक गावं पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. त्यानंतर आता वर्धा नदीकिनारी असलेल्या ३४ गावांना सावधानतेचा इशारा प्रशासना कडून देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून शासनाकडून सुमारे ३३० स्थानिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. येलमपल्ली धरणाचे ६२ पैकी ४८ दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
विदर्भात मुसळधार पावसाची बॅंटीग चालू असल्यामुळे वर्धा नदीला पूर आले आहे. चंद्रपूर-राजुरा, घुगुस-चंद्रपूर आणि वरोरा-वणी-यवतमाळ हे मार्ग बंद झाले आहे. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येलमपल्ली धरणाचे ६२ पैकी ४८ दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासन खबरदारी म्हणून योग्य ती काळजी घेण्यास सांगत आहे. वर्धा नदी काढी वसलेल्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.